tujhi-athvan

तुझी आठवण..

“There are memories that time does not erase… Forever does not make loss forgettable, only bearable.”
तुझी आठवण…

कधी आभाळ फाटून कोसळणार्या पावसा सारखी
तर कधी गवताच्या पातीवर पडणार्या दवा सारखी

कधी खळखळणार्या नदी सारखी
तर कधी मंद वाहणार्या वार्या सारखी

कधी स्वछंद उडणार्या पाखरा सारखी
तर कधी मिटलेल्या लाजाळुच्या पाना सारखी

कधी निरागस कोमल हास्या सारखी
तर कधी आसवांच्या नाजूक फुला सारखी

कधी गडगडणार्या मेघां सारखी
तर कधी भयाण शांत रात्री सारखी

तुझी आठवण..
मला स्वप्नांच्या वादळात नेते सारखी
तुझी आठवण..
माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर येते सारखी…..

– अश्वीनी नवाथे

Image courtesy: Ajay Pake.


© 2019 Ashwini Nawathe, Kaleidoscope of My Life
All Rights Reserved

9 thoughts on “तुझी आठवण..

  1. अतिशय सुंदर, तरल, भावपूर्ण लिहिलंस.
    दोन्ही कविता अतिशय ऊत्तम !
    तू अशी लिहिती रहा……

Leave a Reply