आज पुन्हा

If I knew that the last time I met you would be the last time ever, I would have never let you go…
आज पुन्हा तुझ्या प्रेमात पडायचंय
परत त्या पाऊल वाटेने जायचंय
राना वनातून फिरताना नजर चोरून लाजायचंय
आज पुन्हा तुझ्या प्रेमात पडायचंय
तुझ्या मिठीत शिरून परत एकदा मनमोकळं रडायचंय
राहूनगेलेलं सगळं सगळं तुला सांगायचंय
आज पुन्हा तुझ्या प्रेमात पडायचंय
इतके पावसाळे येऊन गेले तरी
पुन्हा त्याच पावसात तुझ्या सोबत भिजायचंय
हरवलेलं स्वप्न परत ओंजळीत फुलवायचंय
आज पुन्हा तुझ्या प्रेमात पडायचंय
बघायचीये एकदा पुन्हा सुरुवात करून आपल्या गोष्टीची
ह्यावेळी तरी तू माझा होशील का ते पाहायचाय
आज पुन्हा तुझ्या प्रेमात पडायचंय
मनात जपलेल्या आपल्या नात्याला
खऱ्या आयुष्यात घडवून आणायचंय
आज पुन्हा तुझ्या प्रेमात पडायचंय….
-अश्विनी नवाथे


© 2018 Ashwini Nawathe, Kaleidoscope of My Life
All Rights Reserved

0 thoughts on “आज पुन्हा

Leave a Reply