अजून खूप जगायचंय

<3 <3 A poem very close to my heart and filled with memories. <3 <3 Your मन्या is writing and publishing regularly Aaji… :*

येवढं आयुष्य जगूनही अजून खूप जगायचं राहिलंय
तुझ्याशी खूप बोलूनही अजून खूप बोलायचं राहिलंय
आयुष्यभर काम करूनही अजून काही करायचं राहिलंय
मुलं मोठी झाली तरी त्यांच्याशी एकदा खेळायचं राहिलंय
अनेक पावसाळे पहिले तरी मनसोक्त भिजायचं राहिलंय
कित्येक सुट्ट्या येऊन गेल्यातरी पुन्हा झाडाखाली भेटायचं राहिलंय
घड्याळ मागे धावताना स्वतःसाठी थांबायचं राहिलंय
येवढं आयुष्य जगूनही अजून खूप जगायचं राहिलंय
-अश्विनी नवाथे
© 2018 Ashwini Nawathe, Kaleidoscope of My Life
All Rights Reserved

0 thoughts on “अजून खूप जगायचंय

  1. एवढ कुठे तुझं जगून झालंय्…..
    अजून खूप जगायचंय….
    अजून जग बघायचंय…..!!
    आणि अजून तुला असंच छान छान लिहायचंय्…..
    😍❤🌹

  2. वाह!! जमलंय की… छान .. मराठी पण लिहीत राहा… बरंच लिहून झालं तरी अजून खूप लिहायचं राहिलंय..

Leave a Reply